Shree Santaji Maharaj Nagari Patsanstha

नोंदणी क्र. (एन.एस.के.) आर.एस.आर. (सी.आर.) ३५७/८९ दि. २/१२/१९८९

श्री संताजी महाराज

नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक

फोटो गॅलरी

श्री संताजी महाराज पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजन व २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मार्गदर्शक गजानन शेलार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष अशोकशेठ कस्तुरे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करताना संस्थेच्या एकूण ठेवी ३७ कोटी ४१ लाख असून, कर्जवाटप २८ कोटी १४ लाख, तर भाग भांडवल एक कोटी ४२ लाख रुपये आहे, असे सांगितले.

श्री संताजी महाराज पतसंस्थेत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात

नाशिक येथील अग्रगण्य आणि नामांकित श्री संताजी महाराज नागरी पतसंस्थेत श्री संताजी महाराज जगनाडे यांची ४००वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस व धर्मदाय सहआयुक्त विवेक सोनुने, गजानन शेलार, अशोक कस्तुरे, डॉ. भूषण कर्डिले यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पतसंस्थेचे संचालक अविनाश पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. या प्रसंगी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा उषा शेलार, चिटणीस डॉ. शरद महाले, यशवंत चौधरी, नितीन महाले, अंजली आमले, मंदाकिनी क्षीरसागर, राजेंद्र गवळी, अशोक कर्पे, ज्ञानेश्वर रोकडे, अमर किर्वे, मोहनलाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थी गुणगौरव समारंभ

श्री. संताजी महाराज पतसंस्था व संताजी मंडळ नाशिक यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.

नाशिक येथील श्री. संताजी महाराज पतसंस्था व संताजी मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक  २५/०८/२०२४ रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ रोटरी क्लब गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. सदर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास धर्मदाय सहआयुक्त श्री. विवेक सोनुने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी श्री. गजानन नाना शेलार श्री. अशोक वेडूशेठ कस्तुरे श्री. डॉ.भूषण वसंतराव कर्डिले श्री. मोहनलाल चौधरी श्री. अशोक काका व्यवहारे श्री. रमेश मामा वनकर आदी मान्यवर व विद्यार्थी पालक उपस्थित होते.